सांधेदुखी व त्यावर घरगुती उपाय

चालताना उठताना व बसताना काम करताना वागताना सांध्यामध्ये त्रास होतो अशावेळी सांधेदुखीवर घरगुती उपाय करून आराम मिळू शकतो 


1).   सांधेदुखीचा त्रास असल्यास दोन चमचे बडीशेप व सुंठीचे तुकडा चार कप पाण्यामध्ये घालून एक कप पाणी राहील तोपर्यंत उकळावे व अर्धा चमचा एरंडेल तेल घालून त्याप्रमाणे महिनाभर केल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होईल 



2).   दोन चमचे सुंठ दोन चमचे एरंड मुळाची भरड चार कप पाण्यात उकळावी व एक कप पाणी राहिल्यावर गाळून घ्यावे व पिऊन घ्यावे हा काढा नियमित घेतल्यास सांधेदुखी मध्ये निश्चितच आराम मिळेल 


3).    निरगुडेचे पाणी पाण्यामध्ये उकळून त्याच्या वाफेने सांदा शिकल्यास सूज व वेदना कमी होतात 

4).   एरंडीची पाने वाफवून कुठून दुखत असलेल्या सांध्यावर बांधावे 


5).   मुठभर ओवा एरंड तेल तव्यावर गरम करून सुती कपड्यात बांधून पोटली करावी व त्याने दुखणारा सांधा शेकावा 


6).    सांधे दुखत असल्यास मेथीचे व डिंकाचे लाडू नियमित खाल्ल्यास फायदा होतो 


7).     रोजची कणिक मळताना चमचाभर एरंड तेलाची मोहन घालून केलेली पोळी किंवा फुलका खावा यांनी सांधेदुखीचा व सर्व सांधित संबंधित समस्या दूर होतात 

           रात्री उशिरा भरपेट जेवण करू नये वजन जास्त असल्यास कमी करावे नियमित योगासने करावी व सकाळी चालायला जावे असे केल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होतो तीळ व आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले तेल नियमित लावल्यास व आहारामध्ये योग्य प्रमाणात साजूक तूप समाविष्ट केल्यास शरीराचे स्नेहान होऊन सांधेदुखी कमी होते 


✍️पुष्पलता इंगोले जगताप यवतमाळ ✍️

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

वातविकारावर घरगुती उपचार – लक्षणे, कारणे आणि उपाय

पावसाळ्यात पोटाचे विकार टाळण्यासाठी १० सोपे आणि प्रभावी उपाय