✍️केस गळणे ✍️
1). केस गळणे हे सौंदर बिघडविणारी सर्वात मोठी समस्या आहे केस गळणे थांबून ते पुन्हा परत आणण्यासाठी काही उपाय आहेत काय आहे केसाचे आरोग्य हे बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते त्यामुळे फक्त तेल लावून केस गळणे थांबवणे अवघड आहे पण जर तुम्ही हेअर लॉस थांबवण्यासाठी केसाची निगा संपूर्ण घेतली म्हणजे तुमचे केस पुन्हा वाढायला लागतील यासाठी आणखी काय करता येईल ते आपण पाहू
2). मक्काचे तेल घेऊन त्यामध्ये आवळ्याचा रस किंवा जास्वंदीचे पाणी उपलब्ध असल्यास त्याचा रस मिक्स करून केसांना मालिश करावी
3)..... हावड़ा कोथिंबीर आणि लिंबू याचे मिश्रण केसांना लावा थोड्यावेळाने केस धुवून घ्या केस मजबूत होतील आणि तुटणार नाहीत
4).... बादाम खाण्यामुळे केसांना आवश्यक असणारे विटामिन्स मिळतात
5). केसांना डाय करणे कलर करणे प्रेस करणे किंवा कोणत्याही प्रकारे केसांना नुकसान पोहोचले पोहोचेल अशा गोष्टी करणे टाळा
6) वाईट व्यसना पासून दूर राहा
7). पौष्टिक आणि योग्य आहार व्यायाम केसांना तेल लावणे भरपूर पाणी प्यावे
8). हेयर लॉस प्रोबलम होण्या साठी अनेक कारणे असतात त्यामध्ये एक व्हिटॅमिन डी ची कमतरता हे देखील एक कारण असू शकते जसे इतर पोषक घटक केसांचे आरोग्य वाढवतात तसेच व्हिटॅमिन डी हे देखील केसाचे आरोग्य वाढवते विटामिन डी हे एक निशुल्क असा घटक आहे विटामिन डी केसांच्या वाढीसाठी मदत करतो व्हिटॅमिन डी स्वतःहून आयरन आणि कॅल्शियम शोषून घेतो आयरन ची कमतरता पण हेअर लॉस होण्याचे कारण असते तुम्ही दिवसातील पंधरा मिनिट सूर्यप्रकाशात राहिलात तरी तुमची त्या दिवसाची व्हिटॅमिन डी ची आवश्यकता पूर्ण होते सूर्यकिरण घेत असताना सकाळचे किंवा संध्याकाळचे सूर्यकिरण अंगावर घ्या प्रखर सूर्यकिरण त्वचेला अपाय करू शकते हे पण लक्षात ठेवा
9 बरेचसे लोक असंतुलित खानपानाच्या सवयीमुळे हेअर लॉस प्रॉब्लेम मध्ये असतात केवळ पौष्टिक आहार घेऊन हेयर लॉस प्रॉब्लेम पासून दूर राहता येत नाही
🙏धन्यवाद 🙏
🙏पुष्पलता इंगोले जगताप यवतमाळ 🙏
Comments
Post a Comment