दिवसभरात पाणी पिणे आवश्यक आहे आणि त्याचे फायदे काय

✍️ पाणी पिण्याची योग्य पध्दत ✍️


दिवसभरात किती पाणी प्यावे हे तुमचे वय तुमचे वजन आणि हवामान व शारीरिक श्रमावर अवलंबून असते सामान्यता 2.5 ते 3.5 लिटर म्हणजेच आठ ते दहा ग्लास पाणी पिणे शरीरासाठी तसेच आरोग्यासाठी उत्तम मानले जाते 

पाणी पिण्याचे फायदे 

शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकते लघवी व भामाद्वारे हानिकारक पदार्थ बाहेर टाकते 
पाचन प्रक्रिया सुधारते अन्नपचनास मदत करते व बद्धकोष्ठता चा त्रास कमी होतो 
त्वचेसाठी फायदेशीर त्वचेला तजेलदार आणि हायड्रेटेड ठेवते 
थकवा आणि डोकेदुखी कमी करते 

निर्जलीकरणामुळे होणारा थकवा व डोकेदुखी दूर राहते 

शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते विशेषता उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव करते 

🫧 कोणत्या वेळी पाणी पिणे योग्य 🫧

*सकाळी उठल्यावर दोन ग्लास पाणी प्या 
शरीर डिटॉक्स राहत

जेवणाच्या तीस मिनिटे आधी पाणी प्या 

*भूक नियंत्रित होते आणि पचन सुधारते 


*व्यायामाच्या आधी आणि नंतर पाणी प्या 
स्नायू तंदुरुस्त राहते 

*रात्री झोपण्यापूर्वी थोडे पाणी प्या 

शरीर हायड्रेट राहते पण जास्त पाणी पिऊ नका 

*गरजेपेक्षा जास्त पाणी प्याल्यास पाण्यामुळे सुद्धा विषबाधा होऊ शकते ज्यामुळे सोडियमची कमतरता होऊ शकते 

एकदम भरपूर पाणी न पिता थोड्या थोड्या प्रमाणात दिवसभर पाणी प्यावे 

*उन्हाळ्यात जास्त घाम जातो त्यामुळे पाण्याचे प्रमाण वाढवावे 

*गरोदर स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी अधिक पाणी प्यावे 

*जर पाणी कमी प्याल्यास तोंड कोरडे पडणे लघवीचा रंग गडध होणे थकवा येणे यासारखे लक्षणे दिसू लागतात 


🙏 पुष्पलता इंगोले जगताप यवतमाळ 🙏 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏





Comments

Popular posts from this blog

वातविकारावर घरगुती उपचार – लक्षणे, कारणे आणि उपाय

पावसाळ्यात पोटाचे विकार टाळण्यासाठी १० सोपे आणि प्रभावी उपाय