✍️"ओम्"उच्चारणे फक्त धार्मिकच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे✍️
रोज फक्त पाच मिनिट ओम उच्चारण केल्याने मेंटली आणि फिजिकली फायदे होतात
कसे करावे ओम् उच्चारण ?
ओम उच्चारण करण्यासाठी कोणत्याही पोझिशनमध्ये बसा डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या आणि नंतर ओम उच्चारण करत हळूहळू श्वास सोडा या काळात पूर्ण शरीरात व्हायब्रेशन होईल याचा प्रयत्न करा जर ओम उच्चारण करताना कान बंद करता आले तर यापेक्षा जास्त फायदा होऊ शकतो
*ओमकार जपाचे महत्त्व आणि परिणाम*
१) मानवी मनाची शुद्धता करणे
२) मानवी मनातील भावनांवर नियंत्रण करणे
३). मनाची एकाग्रता स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढविणे तसेच एखादी गोष्ट समजून घेण्याची मनाची पात्रता वाढवी
४). शारीरिक दृष्ट्या मानसिकरित्या आराम वाटणे तसेच भावभावनावर नियंत्रण आणणे
५). ओमकार जपामुळे आजूबाजूच्या वातावरणामध्ये एक प्रकारचे तरंग निर्माण हो ते वातावरण भारावून टाकेल व त्यामुळे मानवी मन त्या वातावरणामध्ये हरवून जाते व समाधी स्थितीत गाठणे सोपे जाते
ओम कार जप;
ओऽऽऽऽऽ म ...,....,.ओऽऽऽऽऽऽ म् ..........ओ ऽऽऽऽऽऽ म् ..........
_______________________________________________
ओंकाराच्या उच्चाराने मिळवा अनेक आजारांनावर नियंत्रण
हिंदू धर्मात ओंकाराचे महत्त्व अनन्य साधारण आहे जीवसृष्टीतील पहिला ध्वनी ओम असल्याचे मानतात मंत्र ओंकार नसल्यास मंत्र अपूर्ण वाटतात परंतु धार्मिक महत्वाशिवाय ओंकाराचे शारीरिक महत्त्वही आहे शारीरिक स्तरावर अनेक फायदे होतात
तुम्ही अनभिज्ञ असलेल्या ओंकाराच्या फायद्याविषयी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे
१) थायरॉईड -
ओंकाराचा उच्चार केल्याने गळ्यात कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो
२) अस्वस्थता--
तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर डोळे बंद करू पाच वेळा लांब श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करा
४) रक्तप्रवाह--
यामुळे हृदयसदृढ राहून रक्तप्रवाह सुरळीत राहतो
५). पचन
ओंकाराचा उच्चार केल्याने पचनशक्ती वाढते
६). स्फूर्ती
ओंकार मुळे शरीरात स्फूर्तीचा संचार होतो
७) थकवा
थकवा मिळवण्यासाठी याहून दुसरा चांगला उपाय नाही
८). झोप
ओंकाराच्या नियमित उच्चाराने काही दिवसातच झोप न येण्याची समस्या दूर होते म्हणून झोपण्यापूर्वी ओंकाराचा उच्चार करणे आवश्यक आहे
९). फुफ्फुस
ओंकाराच्या उच्चाराने फुफुसाचे कार्य सुधारते
१०) पाठीचा कणा
ओंकार मळे
निर्माण होणारे कंपनी पाठीच्या कण्याला बळकट बनवतात
🙏धन्यवाद 🙏
पुष्पलता इंगोले जगताप यवतमाळ
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
-
Comments
Post a Comment