शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय
अनेकांना शरीरात उष्णतेचे प्रमाण जास्त असल्याने काही समस्या उद्भवतात डोळ्याचे आग होणे छातीत जळजळ होणे अंगावर उष्णतेचे फोड अशा समस्या येतात अनेकांच्या अंगात उष्णतेचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे अशा व्यक्तींना कोणत्याही ऋतूमध्ये उष्णतेचा त्रास जाणू शकतो अनेक जणांना या काळात डोळ्याची आग होणे छातीत जळजळ करणे अंगावर उष्णतेचे फोड येणे अशा तक्रारी जाणवतात आणि त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्याचे काही घरगुती उपाय आहेत जे शरीरातील उष्णता तर कमी करतातच आणि त्याचबरोबर आपल्या तब्येतीची सुद्धा सुरक्षा होते बघूया काही घरगुती उपाय
मनुका
मनुका हा सर्वोत्तम उपाय आहे त्यासाठी रोज रात्री दहा ग्रॅम मनुका कोमट पाण्यात भिजत घाला सकाळी उठल्यावर हे मनुके सेवन करावे आणि ते पाणीही पिऊन घ्यावे
शरीरातील उष्णता किंवा पित्त कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात थंड पदार्थाचे समावेश करावा यासाठी तुम्ही आहारात काकडी आवळा टरबूत ब्रोकोली इत्यादीचे सेवन करू शकता यामुळे शरीरातील उष्णता कमी होईल आणि आरोग्यालाही त्याचा फायदा होईल
जिरे
जिरे अत्यंत थंड आहे रात्री एक कप पाण्यात अर्धा चमचा जिरे टाकून सकाळी त्या पाण्याचे सेवन करावे यामुळे शरीराला थंडावा मिळतो यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते
पाणी समृद्ध आहार घ्या शरीरातील उष्णता दूर करण्यासाठी आपण पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे रोज दोन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे याशिवाय फक्त पाण्याने युक्त असा आहार घ्यावा यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काकडी टरबूज स्ट्रॉबेरी नारळ पाणी फळांचा रस इत्यादीचा समावेश करू शकता याशिवाय सुख भाज्यांचा रस उसाचा रसही फायदेशीर ठरू शकतो
सब्जा
रात्री सब्जा काचेच्या भांड्यात भिजत घालून सकाळी खडीसाखर घालून उपाशी पोटी प्यावा
वेळेवर खा
शरीरातील उष्णता दूर करण्यासाठी वेळेवर खाणेही खूप गरजेचे आहे त्यामुळे शरीरातील आग योग्य प्रकारे वापरली जाते. पाच चक्र सिद्ध देखील सुनिश्चित केला जातो शरीराला थंडावा देण्यासाठी जेवणासोबत सॅलेड जरूर खा शरीरातील उष्णता शांत करण्यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे
उष्णता वाढवणारे पदार्थ टाळा
उष्णता वाढवणारे पदार्थ टाळावेत असे अनेक पदार्थ आहेत जे तुमच्या शरीरातील उष्णता वाढता काळीमिरी दालचिनी, लवंग यासारखे गरम मसाले शरीरातील उष्णता वाढवतात त्यामुळे या सर्व गोष्टी खाणे टळा
पुदिना
जेवताना पुदिनयाचा जास्त वापर करावा याची चटणी करूनही आहारात समाविष्ट करू शकता
कोकम सरबत
जर कधी स्पायसी किंवा जंक फूड खाल्ली किंवा जास्त मसालेदार पदार्थ खाल्ले तर थोड्यावेळाने लगेच कोकम सरबत प्यावे
नारळ पाणी
तापमान झपाट्याने वाढणे शरीरासाठी चांगले तुम्ही नारळाच्या पाण्याचे सेवन करू शकता यामध्ये विविध जीवनसत्वे आणि खनिजे देखील भरपूर असतात जे उन्हाळ्यात शरीराला रोगापासून वाचवण्यास मदत करतात
पुदिना पाणी
पुदिन्याचे पाणी शरीराला थंडावा देण्याबरोबर ताजेपणाही देतात याशिवाय त्यांचे अँटीबॅक्टरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीराला अनेक आजारापासून वाजवतात आणि म्हणूनच शरीर हळूहळू थंड होण्यासाठी तुम्ही पुदिन्याचे पाणी पिऊ शकता शरीराला हायड्रेट करण्यासोबतच स्नायूंची ताकद वाढवण्यासही मदत करत
ताक प्या
उन्हाळ्यात ताकाचे पाणी अतिशय फायदेशीर मानले जाते ताकाचा थंड प्रभाव असल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते ताक देखील पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे ते शरीराला ऊर्जा देते उष्णतेचा सामना करण्यासाठी आपण दररोज एक ग्लास थंड ताक प्यावे
ह्या काही आरोग्य विषयक टिप्स होत्या
🌹धन्यवाद 🌹
🙏पुष्पलता इंगोले जगताप यवतमाळ 🙏
🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌹
होईल
Comments
Post a Comment